Advertisement

खुशखबर,बीडमध्ये गजबजणार मिना बाजार

प्रजापत्र | Friday, 15/04/2022
बातमी शेअर करा

बीड दि.१५ (प्रतिनिधी)-कोरोना आणि लॉकडाऊननंतर तब्बल २ वर्षांनी शहरातील राजुरीवेस, बशिरगंज भागात मिना बाजार गजबजणार आहे. नय्यर खान मिना बाजारमध्ये ७५ तात्पुरत्या गाळ्यांची बांधणी करण्यात येणार असून या संदर्भात बैठक घेवून नियोजन करण्यात आले आहे.

 

बीड शहरातील राजुरीवेस-बशिरगंज- अशोक टॉकीजच्या समोरील परिसरात दरवर्षी रमजान ईद निमित्त मिना बाजार भरवण्यात येतो. मात्र कोरोना आणि लॉकडाऊनमुळे गेली २ वर्षात मिना बाजार भरला नव्हता,मात्र यावर्षी कोरोनाचे सर्व निर्बंध मागे घेण्यात आल्याने शुक्रवारपासून (दि.२२) मिना बाजार भरवण्यात येणार असल्याची माहिती आहे.
 

Advertisement

Advertisement