Advertisement

पिकअप ट्रॅक्टरची समोरासमोर धडक;दोन ठार चार गंभीर जखमी

प्रजापत्र | Wednesday, 13/04/2022
बातमी शेअर करा

माजलगाव दि.13 एप्रिल – राष्ट्रीय महामार्ग 548 सी या रस्त्यावर नित्रुड ता. माजलगाव जवळ अपघात होवून दोन ठार तर चार जण जखमी झाले आहेत. पंढरपूरहून आपल्या गावी परतणाऱ्या भाविकांवर संकट कोसळले आहे. घटनास्थळाकडे दिंद्रुड पोलिस (Police) रवाना झाले आहेत.

 

माजलगाव ते धारुर (Majalgoan Dharur) या राष्ट्रीय महामार्ग (National Highway) क्र. 548 सी रस्त्यावर अपघाताचे (Accident) प्रमाण वाढले आहे. माजलगाव तालुक्यातील दोन व धारुर तालुक्यातील एका साखर कारखान्यामुळे या रस्त्यावर मोठी वर्दळ असते. 

 

आज दि.13 बुधवारी तेलगाव जवळ पिकअप ट्रॅक्टरची समोरासमोर धडक होवुन भीषण अपघात (horrific accident) झाला. सदर अपघात हा पंढरपूरला निघालेल्या भाविकांचा असल्याचे कळते. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहेत. दुपारी साडेतीन वाजता हा अपघात घडला. पंढरपूर हुन परत सेलु जि. परभणीकडे जाणाऱ्या भाविकांवर काळाने झडप घातली आहे. चार ते पाच जण या अपघातात गंभीर असल्याची माहिती येत आहे. अद्याप मयत व जखमींची नावे समजू शकली नाहीत.

 

( Another horrific accident on Dharur-Majalgaon road; Two killed, four injured. )

Advertisement

Advertisement