Advertisement

लाचखोर महिला कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

प्रजापत्र | Monday, 11/04/2022
बातमी शेअर करा

बीड: आहिल्यादेवी होळकर, जलसिंचन योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या विहिरीचे सांकेतिक क्रमांक घेण्यासाठी पाटोदा पंचायत समितीतील सहायक कनिष्ठ महिलेने हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडतोजडअंती पाचशे रुपये स्विकारताना बीड एसीबीने सोमवारी (दि.११) रंगेहाथ पकडले. या कारवाईने खळबळ उडाली आहे.
मिरा विलास नागरगोजे (वय ३९) असे लाचखोर महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. ती पाटोदा पंचायत समितीमध्ये कनिष्ठ सहायक म्हणून कार्यरत आहेत. तीने तक्रारदाराकडे त्यांच्या वडीलांच्या नावावरील आहिल्यादेवी होळकर, जलसिंचन योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या विहिरीचे सांकेतिक क्रमांक घेण्यासाठी एक हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडअंती पाचशे रुपये लाच स्विकारताना नागरगोजे हिला एसीबीने रंगेहाथ पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ.राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, बीड उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल धस, पोलीस अंमलदार श्रीराम गिराम, हनुमान गोरे, भरत गारदे, चालक गणेश म्हेत्रे यांनी केली आहे. या प्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Advertisement

Advertisement