Advertisement

KBC च्या नावाने ऑनलाईल फसवणुक

प्रजापत्र | Friday, 08/04/2022
बातमी शेअर करा

बीड दि.८ – केबीसी च्या नावाने ऑनलाइन फसवणूक करून लाखो रुपयांना लुटणारी टोळी बीड पोलिसांनी जेरबंद केल्याने अनेकांची पुढे होणारी फसवणूक थांबली आहे.

            सविस्तर वृत्त असे की, दि. 11/12/2021 रोजी अज्ञात व्यक्तीने फिर्यादी चा मोबाईल KBC गृपमध्ये समाविष्ट करुन त्यांना KBC गृप मधुन मोबाईलद्वारे व्हीडोओ व ऑडिओ संदेश केला की, तुम्हाला 25 लाख रु. लॉटरी लागल्याचे व चारचाकी गाडी बक्षीस म्हणुन मिळणार आहेत असे अमिष दाखवून त्यांच्याकडुन GST व TAX या करीता वेळोवेळी पैशाची मागणी करुन वेगवेगळे मोबाईल क्रंमाकावरुन तसेच वेगवेगळे बॅकेचे अकांउंट क्र. देवुन त्यावर पैसे भरण्यास सांगुन 29,23,000/- रु. ची आर्थिक फसवणुक केली आहे वगैरे तक्रारीवरुन दिनांक 03/03/2022 रोजी पोलीस स्टेशन बीड शहर येथे गु.र.नं. 40/2022 कलम 419, 420, 464,468,469,471,34 of IPCr/w 66 (A), 66 (C), 66(D) of IT Act नुसार अज्ञात आरोपीताविरुध्द गुन्हा करण्यात आला होता. मा. पोलीस अधीक्षक बीड यांच्या आदेशान्वये सदरचा गुन्हा सायबर पोलीस स्टेशन, बीड येथे वर्ग करण्यात आलेला होता.

                गुन्हयाचा तपास करणे अत्यंत गुंतागुंतीचे होते. सायबर पोलीस स्टेशन, बीड येथील पोलीस अधीकारी व पोलीस अंमलदार यांनी तांत्रीक पध्दतीने अहोरात्र मेहनत घेऊन गुन्हयातिल आरोपीना 30 दिवसात निष्पन्न केले. यामध्ये साहील रंजन भिक्षुककुमार वय 21 रा. पुर्व इंदिरानगर, रोड नं. 4 कनकरबाग सम्पतचकलोहीयानगर, पटना, राज्य बिहार, संतोषकुमार सिध्देश्वरकुमार शर्मा वय 21 वर्ष रा. पीसी548 विद्यापुरी कंकरबाग सम्पतचक, पटना राज्य बिहार, अमनराज राजकुमार वय 21 वर्ष रा. पुर्व इंदिरानगर पोस्ट लोहीयानगर, रोडनं. 4 कंकरबाग पटना, राज्य बिहार, अतुलकुमार गौतमकुमार सिन्हा वय 20 वर्ष रा. आंबेडकरचौक हनुमाननगर कंकरबाग पटना, बिहार इत्यादी आरोपीनी गुन्हा केल्याचे कबुली दिली आहे. वरील आरोपीकडुन हार्डडिस्क, वायफाय मोडेम पाच मोबाईल, फिंगरप्रिंट स्कनर, इत्यादी साहीत्य जप्त करुन आरोपीना दिनांक 02/04/2022 रोजी अठक करण्यात आली. सदर आरोपीना मा. न्यायालय, बीड येथे रिमांडसह हजर केले असता, मा. न्यायालयाने 08 (आठ) दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे. वरील आरोपीची चौकशी चालु असुन आणखी आरोपी निष्पन्न होण्याची दाट शक्यता आहे. तसेच गुन्ह्यातिल फसवणूक झालेली रकमेचा तांत्रीक पध्दतीने शोध घेणे सुरु आहे.

                          सदर कामगीरी मा. पोलीस अधीक्षक बीड सो. मा. अप्पर पोलीस अधीक्षक सो, बीड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड, पो. उपनि जाधव, पो.ह. जायभाये, पो.ना. आसेफ शेख, अनिल डोंगरे, विजय घोडके, अन्वर शेख, बप्पासाहेब दराडे, पंचम वडमारे, संतोष म्हेत्रे, प्रदिपकुमार वायभट व महीला पोलीस अंमलदार शुभांगी खरात सर्व सायबर पोलीस स्टेशन बीड यांनी केली आहे.

Advertisement

Advertisement