बीड-संपूर्ण राज्यात, विशेषतः मराठवाड्यात आज अतिरिक्त ऊसाचा प्रश्न गंभीर झाला आहे. पण ऊसाचे गाळप पूर्ण झाल्याशिवाय कारखाने बंद करु नका असे आवाहन मी सर्व साखर कारखान्यांना करतो असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
अतिरिक्त ऊसाचा कारखान्यांना फटका बसू नये म्हणून कारखान्यांना वाहतूक, रिकव्हरी अनुदान देऊ, पण शेतकऱ्याचा ऊस राहू देऊ नका असेही अजित पवार यांनी म्हटले आहे. यामुळे आता उशिरापर्यंत कारखाने सुरु रहायला मदत मिळणार आहे.येडेश्वरी कारखान्यावरील कार्यक्रमात ते बोलत होते.
बातमी शेअर करा