Advertisement

बॅटने पत्नीला मारहाण

प्रजापत्र | Friday, 01/04/2022
बातमी शेअर करा

अंबाजोगाई - महिला तक्रार निवारण केंद्रात तक्रार का केलीस असे म्हणत पतीने बॅटच्या साह्याने पतीनीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत बॅट कानाला लागून तिच्या कानाचा पडदा फाटला आणि ऐकू येणे बंद झाले. याप्रकरणी पतीवर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. 

 

 

शेख कौसर शेख अजहर (रा. सदर बाजार, अंबाजोगाई) असे त्या जखमी महिलेचे नाव आहे. आठ वर्षापूर्वी शेख कौसरचा विवाह शेख अजहर शेख सिराज याच्यासोबत झाला आहे. काही दिवसांपूर्वी शेख कौसरने पतीच्या विरोधात महिला तक्रार निवारण केंद्रात तक्रार दिली होती. ३० मार्च रोजी अजहरने शेख कौसरला माझ्या विरोधात तक्रार का दिली होतीस, माझ्याबद्दल आईवडिलास उलटसुलट का सांगतेस, माझे काम ऐकत नाहीस म्हणून शिवीगाळ करून क्रिकेटच्या बॅटने मारहाणीस सुरुवात केली आणि लाथाबुक्क्याही मारला या मारहाणीत बॅट कानावर लागून शेख कौसरच्या कानाचा पडदा फाटला आणि तिला ऐकू येणे बंद झाले असे तिने दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. सदर फिर्यादीवरून अजहरवर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

Advertisement

Advertisement