सय्यद शाकेरअली
किल्लेधारूर-शहरातील किल्ल्याच्या शेजारी असलेल्या लाला खडक परिसरातील खोरीत आज (दि.२८) मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाली असून तपास सुरु केला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, येथील ऐतिहासिक किल्ल्याच्या तीन बाजुने बालाघाटची डोंगर रांग आहे. किल्ल्याच्या उत्तरेस असलेल्या लाला खडक भागातील खोरीत आज (दि.२८) सकाळी एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. यामुळे परिसरात एकच गर्दी झाली.पोलिसांना सदर प्रकाराची माहिती मिळताच एपिआय मिसाळ यांच्यासह पीएसपाय भालेराव पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल झाली. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून शहरातीलच व्यक्तीचा असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून पंचनामा केला. पोलिस अधिक तपास करीत आहेत. मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.
बातमी शेअर करा