Advertisement

पीएम किसान योजनेच्या ‘ई-केवायसी’बाबत मोठा निर्णय

प्रजापत्र | Sunday, 27/03/2022
बातमी शेअर करा

मोदी सरकारच्या महत्वाकांक्षी योजना म्हणजे, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना.. शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये 6 हजार रुपये दिले जातात.

आतापर्यंत शेतकऱ्यांना 10 हप्ते मिळाले असून, येत्या एप्रिलमध्ये योजनेचा 11वा हप्ता मिळणार आहे..

पीएम किसान सन्मान निधी योजनेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याची बाब समोर आली होती.. त्यानंतर केंद्र सरकारने या योजनेच्या नियमांत काही बदल केले आहे.

सरकारने शेतकऱ्यांना 31 मार्चपूर्वी ‘ई-केवायसी’ करण्याची सूचना केली होती. ‘ई-केवायसी’ न करणाऱ्या शेतकऱ्यांना 11वा हप्ता मिळणार नसल्याचे सांगण्यात येत होते.

पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी ई-केवायसी करताना, शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचणी येत आहेत.

ही प्रक्रिया ऑनलाईन करता येत असली, तरी बहुतांश शेतकऱ्यांना त्याची माहिती नाही.

त्यामुळे शेतकरी प्रत्यक्ष ‘सीएससी’ केंद्रावरच ही प्रक्रिया करीत आहेत. या केंद्रासमोर शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या आहेत.

पण, आता पीएम किसान योजनेअंतर्गत इथून पुढचे म्हणजेच मार्च 2022 नंतरचे हप्ते मिळवण्यासाठी लाभार्थ्यांना ई-केवायसी करणं अनिवार्य आहे.

त्यामुळे मार्च 2022 पासून पुढचे हप्ते मिळवण्यासाठी तुम्हाला त्याआधी ई-केवायसी करून घेणं गरजेचं आहे. ती कशी करायची, ते जाणून घेऊया.

पीएम किसान योजना काय आहे?

पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

दर 4 महिन्यांच्या अंतरानं 2 हजार रुपयांचा हप्ता, अशापद्धतीनं 3 हप्त्यांमध्ये 6 हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.

साधारणपणे, दरवर्षी एप्रिल महिन्यात पहिला, ऑगस्टमध्ये दुसरा तर डिसेंबरमध्ये तिसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो.

पण, आता या योजनेशी संबंधित एक नवीन बदल समोर आला आहे. तो म्हणजे पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास तुम्हाला e-KYC करणं अनिवार्य आहे.

ई-केवायसीसाठी मुदतवाढ

‘ई-केवायसी’साठी या सेंटरवर शेतकऱ्यांना तास न् तास बसावे लागते. कधी वेबसाईट जाम होते, तर कधी बंद पडते. शेतकऱ्यांच्या हाताचे ठसे उमटत नसल्याने ‘केवायसी’ प्रक्रियेत अडचणी येत आहेत.

सातत्याने या प्रक्रियेत अडचणी येत असल्याने शेतकऱ्यांना 31 मार्चपर्यंतच्या मुदतीत ‘ई-केवायसी’ करणं शक्य नव्हतं.

त्यामुळे या प्रक्रियेसासाठी मुदतवाढ देण्याची मागणी होत होती.

त्याची दखल घेऊन मोदी सरकारने या योजनेच्या ‘ई-केवायसी’साठी मुदतवाढ दिली आहे.

त्यानुसार आता शेतकऱ्यांना 31 मेपर्यंत ई-केवायसी करता येणार आहे.

PM Kisan KYC Process | ई-केवायसी कशी करावी

eKYC म्हणजेच Electronic Know your Client. या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं तुमची ओळख पडताळून पाहिली जाते. 

आता पीएम किसान योजनेसाठी eKYC करायची असेल, तर सगळ्यात आधी तुम्हाला pmkisan.gov.in असं सर्च करायचं आहे. त्यानंतर पीएम किसान सन्मान निधीची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल.

ही वेबसाईट उघडल्यावर सगळ्यात वरती तुम्हाला लाल अक्षरात एक सूचना दिसेल.

“eKYC is MANDATORY for PMKISAN Registered Farmers. Pls. click eKYC option in Farmer Corner for Aadhar based OTP authentication and for Biometric authentication contact nearest CSC centres” – अशी ही सूचना आहे.

संकेतस्थळावर उजव्या बाजूला ‘फार्मर्स कॉर्नर’ असा Option दिसेल.त्याखाली ई-केवायसी’e KYC या बटणावर क्लिक करा. त्यानंतर Aadhar Ekyc नावाचं एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल.त्यानंतर  तुम्हाला Aadhar Number टाकायला विचारले जाईल. आधार कार्ड नंबर टाका व Search या बटणावर क्लिक करा.त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकायला लागेल , मोबाईल नंबर टाकल्यानंतर Get OTP या बटनावर क्लिक करायचे.त्यानंतर तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबर वरती OTP येईल तो ओटीपी टाकून घ्यावा. ओटीपी टाकून घेतल्यावर पुन्हा आधार कार्ड लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती ओटीपी पाठवण्यासाठी सूचना मिळेल Get Aadhar OTP असे एक बटन दिसेल त्या बटनावर क्लिक करायचे.त्यानंतर तुमच्या आधार कार्ड लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती OTP येईल. तो OTP टाकायचा व Submit For Auth या बटनावर क्लिक करायचे.त्यानंतर EKYC Successfully Submitted असा मेसेज येईल.याचा अर्थ तुमची EKYC ची प्रक्रिया पूर्ण झाली आहे..!!!
 

Advertisement

Advertisement