Advertisement

भेसळयुक्त दुधाची विक्री करणारा जेरबंद

प्रजापत्र | Friday, 25/03/2022
बातमी शेअर करा

बीड दि.२५ – केमिकल पासून दूध बनवून विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या एकास एएसपी पंकज कुमावत यांच्या पथकाने रंगेहाथ पकडून कारवाई केल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्याचा पर्दाफाश झाला आहे.

           सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना गुप्त बातमिदरा मार्फत बातमी मिळाली की, मौजे नागेश वाडी तालुका पाटोदा जिल्हा बीड येथील इसम आप्पासाहेब हरिभाऊ थोरवे  केमिकल पावडर पासून दूध तयार करून तो दूध त्याचे जवळील दुधामध्ये मिक्स करून दूध डेअरीवर विक्री करण्यासाठी घेऊन जात आहे.त्यानुसार पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे पथकातील पोलीस अंमलदार व अन्न भेसळ अधिकारी यांनी सदर ठिकाणी जाऊन आज सकाळी 7 वाजता छापा मारला. सदर ठिकाणी वरील इसम हा आपले राहते घरी केमिकल पावडर पासून दूध तयार करत असताना तयार केलेले 160 लिटर दूध व केमिकल पावडर व दूध तयार करण्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण 49 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Advertisement

Advertisement