बीड : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आर्थिक निर्बंध घातलेल्या येथील द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेच्या ठेवीदारांना आता डिपॉझिट इन्शुअरन्स महामंडळाने दिलासा दिला असून द्वारकादास मंत्री बँकेतील ग्राहकांच्या अडकलेल्या ठेवी परत करण्याच्या हलचाली सुरु केल्या आहेत. यासाठी इच्छूक ठेवीदारांनी 22 एप्रिल पर्यंत बँकेच्या शाखेत अर्ज दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
येथील द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेवर मोठ्या प्रमाणावर आर्थिक निर्बंध लावण्यात आले आहेत. बँकेतून बचत आणि चालू खात्यातील रक्कम काढण्यावर निर्बंध असतानाच आता ज्या ठेवीदारांनी बँकेत ठेवी ठेवलेल्या आहेत. त्यांना त्यांच्या ठेवी परत मिळविण्याचा मार्ग मोकळा होत आहे. नागरी बँकांमधील ठेवींना विमा संरक्षण असल्याने आता डिपॉझिट इन्शुअरन्स महामंडळाने ज्यांना ठेवी परत हव्या आहेत त्यांना बँकेच्या शाखेत अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. 22 एप्रिल पर्यंत पाच लाखाच्या मर्यादेतील परत मिळविण्यासाठी अर्ज करता येणार असून या ठेवी सहा जूनला परत केल्या जातील असे महामंडळाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
बातमी शेअर करा