Advertisement

लाचखोर पोलिस एसीबीच्या जाळ्यात

प्रजापत्र | Tuesday, 22/03/2022
बातमी शेअर करा

किल्ले धारूर दि.22 मार्च – धारुर (Dharur) पोलिस हद्दीतील आडस चौकीतील पोलिस कर्मचाऱ्यांने गुन्ह्यात मदत करण्यासाठी एकास लाचेची मागणी केली. तडजोड अंती दहा हजार रुपयांची लाच स्विकारताना त्यास रंगेहाथ पकडण्यात आले आहे. ही कारवाई आज मंगळवारी (दि.22) सायंकाळच्या सुमारास आडस ता.केज येथे करण्यात आली. कालच जिल्ह्यात शिरुर कासार तालुक्यात एका तलाठ्यावर कारवाई झाली होती.

 

 

काल (दि.21) सोमवारी सातबारा, आठ अ, फेरफार उतारा आदी कागदपत्रांसाठी एक हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडअंती 500 रुपये स्विकारण्याचे पंचासमक्ष मान्य केले. या प्रकरणी शिरुर तालुक्यातील एका तलाठ्यावर सोमवारी (दि.21) बीड एसीबीने (ACB) कारवाई केली आहे. या प्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात (Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाला 24 तास उलटत नाही तोच धारुर परिसरात लाचखोरीचा दुसरा प्रकार समोर आला आहे.

 

 

जिल्ह्यात विशेष पोलीस महानिरीक्षक दौऱ्यावर असताना पोलिस कर्मचाऱ्यांवर झालेल्या कारवाईने खळबळ उडाली आहे. तेजस वाव्हुळे असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. धारुर पोलीस पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांनी तक्रारदारास गुन्ह्यात मदत करण्यासाठी लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्विकारतांना केज तालुक्यातील आडस परिसरात बीड एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

 

या प्रकरणी धारुर पोलीसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, बीड उपअधीक्षक (Deputy Superintendent) शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बीडच्या पथकाने केली आहे.
( Corrupt police in Dharur caught by ACB; The second incident in the district in twenty-four hours. )

 

Advertisement

Advertisement