Advertisement

चाकूने भोसकून विवाहितेची हत्या

प्रजापत्र | Saturday, 19/03/2022
बातमी शेअर करा

आष्टी - चांगले नांदत नाहीस असे म्हणत संशय घेत अवघे दहा महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा चाकुन भोसकून खून करण्यात आल्याची घटना आष्टी तालुक्यातील वाकी येथे शुक्रवारी (दि.१८) उघडकीस आली. याप्रकरणी पती आणि सासूवर खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला. 

 

प्रमिला अमोल काळे (वय २०, रा. वाकी, ता. आष्टी) असे त्या मृत विवाहितेचे नाव आहे. तिचे वडील कुमार रतन भोसले यांच्या फिर्यादीनुसार, प्रियांकाचे लग्न दहा महिन्यापूर्वी अमोल नवनाथ काळे याच्यासोबत झाले होते. सुरुवातीचे काही दिवस चांगले गेल्यानंतर पती अमोल आणि सासू डूकाबाई यांनी प्रमिलावर संशय घेण्यास सुरुवात केली. चांगले नांदत नाहीस असे म्हणून तिला सतत मानसिक त्रास देत होते. प्रमिलाने मंगळवारी (दि.१५) यात्रेसाठी माहेरी आली असता तिने आईला सासरी होणाऱ्या त्रासाबद्दल सांगितले होते. गुरुवारी (दि.१७) डुकाबाईने भाकरी करण्यासाठी म्हणून प्रमिलाला परत बोलून घेतले. त्यानंतर शुक्रावरी दुपारी ३ वाजताच्या सुमारास डुकाबाईने प्रमिलाचे केस धरून तिला खाली पाडले आणि अमोलने तिच्या पाठीवर चाकूने वार करून ठार मारले असे फिर्यादीत नमूद आहे. सदर फिर्यादीवरून अमोल आणि डुकाबाई काळे या दोघांवर आष्टी पोलिसात खुनाचा गुन्हा नोंद झाला.

Advertisement

Advertisement