किल्लेधारूर धारुर-आडस रस्त्यावर दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन दुचाकीवरील दोघे जखमी होते. यातील जितेंद्र काटे रा. खोडस ( ता. धारुर ) हा गंभीर जखमी होता. त्यांच्यावर लातूर येथील खाजगी दवाखान्यात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजता जितेंद्रची प्राणज्योत मालवली.
बुधवारी ( दि. १६ ) मार्च सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास आडस-धारुर रस्त्यावरील कोळपिंप्री शिवारातील गायरान जवळील वळणावर दुचाकींची समोरासमोर धडक होऊन अपघात घडला. यामध्ये पोटे नवनाथ तुकाराम रा. चाटगाव ( ता. धारुर ) व जितेंद्र नामदेव काटे रा. खोडस ( ता. धारुर ) हे जखमी झाले. या दोघांनाही प्रथम अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जितेंद्र काटेची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी लातूर येथील एका खाजगी दवाखान्यात हलविण्यात आले. येथे जितेंद्रवर उपचार सुरू होते. डोक्याला मार लागल्याने मागील बाजूला कवठी फुटून मेंदुला मार लागल्याने तो बेशुद्ध होता. शेवट पर्यंत शुध्दीवर आलाच नाही लातूर येथेच उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. या अकाली मृत्यूच्या घटनेने खोडस येथे हळहळ व्यक्त केली जात आहे. जितेंद्र काटे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा,मुलगी, एक भाऊ, एक बहीण असा परिवार आहे.
बातमी शेअर करा