बीडः बीड जिल्हा शिवसेनेत आता पुन्हा एकदा 'जगताप पर्व' सुरु झाले आहे. पक्षाने बीड जिल्हा प्रमुख पदाचा प्रभार अनिल जगताप यांच्याकडे दिला आहे. गुटखा प्रकरणात कुंडलिक खांडे यांच्यावर कारवाई झाल्यानंतर चार महिन्यांपासून हे पद रिक्त होते. अनिल जगताप या पुर्विही १३ वर्ष शिवसेना जिल्हा प्रमुख राहिलेले आहेत.
ऐन निवडणूकांच्या तोंडावर अनिल जगताप यांच्याकडे शिवसेनेची सुत्रे आली असून यामुळे पक्षातील अनिश्चितता आणि संभ्रम संपला आहे.
बातमी शेअर करा