माजी सैनिकाला एक किलो बनावट सोने देऊन दहा लाख रूपयाला फसविल्याचे प्रकरण नुकतेच उजेडात आले आहे. ही घटना यवतमाळ येथील आर्णी नाका परिसरात घडली. या प्रकरणी तिघांविरुद्ध अवधूतवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस तिघांचा शोध घेत असून परिसरात सगळीकडे त्यांनी चौकशी सुरू केली आहे. माजी सैनिकाने पोलिसांना झालेला सगळा प्रकार सांगितला आहे. पोलिसांनी जिल्ह्यात किंवा तालुक्यात आणखी कोणाची अशी फसवणूक झाली आहे का ? याची देखील चौकशी सुरू केली आहे. माझी सैनिकाचे नाव शेख दाऊद शेख कालू असं असून त्यांची तिघांनी फसवणूक केली आहे.
नेमकी काय आहे घटना?
शेख दाऊद शेख कालू (वय44,रा. आर्णी) , असे फसवणूक झालेल्या माजी सैनिकाचे नाव आहे. विनोद प्रजापती याच्यासह अन्य दोघांनी त्यांच्याकडे एक किलो सोने असून ते पंधरा लाख रुपयांत विक्री करण्यात येईल असे सांगून माजी सैनिकाला विश्वासात घेतले. माजी सैनिक शेख यांच्याकडे दहा लाख रुपये असल्याने त्या रकमेत ठराव झाला. माजी सैनिकाने ते सोने सराफाला दाखविले असता, बनावट असल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी तिघांचा शोध घेतला. परंतु ते कुठेही दिसून आलेले नाहीत. या प्रकरणी शेख दाऊद यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिघांनी विश्वासात घेऊन केला घात
माजी सैनिकाकडे पैसे असल्याने त्यांना कसं फसवता येईल, अस तीन आरोपींनी डोक लावलं. अखेरीस सोन्याचं अमिष दाखवल्याने माजी सैनिकाने ते दहा लाख रूपयात घेण्याचे मान्य केले. परंतु ते सोन्याच्या दुकानात गेले असता. तिथं त्यांच्याकडे असलेलं सोन खोट असल्याचे समजताचं माजी सैनिकाला धक्का बसला. त्यामुळे त्यांनी पोलिस स्टेशन गाठले सध्या अवधूतवाडी पोलिस संबंधित आरोपीचा शोध घेत आहे. त्यात प्रमुख आरोपी विनोद प्रजापती असून त्यांच्यामुळे फसवणूक झाली आहे. पोलिस विनोद प्रजापतीचा शोध घेत आहे. त्याला ताब्यात घेतल्यानंतर सगळ्या प्रकरणाचा छडा लागेल.