बीड/ठिकठिकाणच्या वार्ताहरांकडून : जिल्ह्यातील अनेक भागात शुक्रवारी (दि.11) दुपारपासून पावसाच्या हलक्या सरी पडल्या. केज आणि आष्टी तालुक्यातील अनेक भागांमध्ये दुपारी आणि सायंकाळच्या सुमारास रिमझिम पाऊस झाल्याचे पहायला मिळाले.
सध्या उन्हाळ्याला सुरुवात झाली असून हवामान खात्याने मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना यॅलो अलर्टचा इशारा दिला होता. त्यानूसार शुक्रवारी आष्टी तालुक्यातील वाघळूज, धानोरा, कडा परिसरात सायंकाळी सहाच्या सुमारास रिमझिम पावसाने हजेरी लावली तर केज शहरातील आणि तालुक्यातील काही ठिकाणी भर दुपारी 3 च्या सुमारास दहा मिनिटे पावसाच्या हलक्या सरी पडल्या. दरम्यान हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविल्याने पीके काढण्यासाठी शेतकर्यांची धडपड सुरु आहे. तुर्तास तरी जिल्ह्यात मोठा पाऊस झाला नसल्याने शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे.
बातमी शेअर करा