Advertisement

आ.सुरेश धस यांना मातृशोक

प्रजापत्र | Friday, 11/03/2022
बातमी शेअर करा

आष्टी-तालुक्याच्या राजकारणातले दिग्गज दिवंगत व्यक्तिमत्व रामचंद्र धस यांच्या पत्नी व माजी मंत्री आ.सुरेश धस आणि माजी जिल्हा परिषद सदस्य देविदास धस यांच्या आई सुमन उर्फ अक्का रामचंद्र धस यांचे शुक्रवारी (दि.११) दुपारी दीर्घ आजाराने उपचारादरम्यान निधन झाले.मृत्युसमयी त्या ७९ वर्षांच्या होत्या.रात्री ९ जामगाव या मूळगावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 
        जिल्ह्यातील आणि तालुक्यातील जनतेशी सुमन धस यांचे सर्वांचे घनिष्ठ संबंध होते. रामचंद्र धस यांची सुरुवातीची राजकीय कारकीर्द अत्यंत संघर्षमय आणि कष्टप्रद असताना आक्का यांनी त्यांना खंबीरपणे साथ दिल्याने ते राजकारणात आणि समाजकारणात यशस्वी ठरवले.
सतत हसतमुख आणि कोणत्याही गोष्टीला सहजपणे सामोरे जाण्याची त्यांची वृत्ती असल्याने त्या सर्वपरिचित होत्या.त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त करण्यात येत असून  त्यांच्या पश्चात देवीदास धस,आ.सुरेश धस हे दोन मुले, तीन मुली,सुना,राधेश्याम,जयदत्त,सागर हे नातवंडे,जावई असा मोठा परिवार आहे.धस कुटूंबियांच्या दुःखात दैनिक प्रजापत्र परिवार सहभागी आहे.

Advertisement

Advertisement