Advertisement

नैसर्गिक वायू होणार स्वस्त

प्रजापत्र | Friday, 11/03/2022
बातमी शेअर करा

मुंबई-राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळाच्या सभागृहात अर्थसंकल्प सादर केला. विकासाची पंचसुत्री राबविणार असून कृषी क्षेत्र आपल्या विकासाचा पाया असल्याचेही त्यांनी सांगितले. पेट्रोल डिझेलवरील कर कमी न केल्याने सामान्यांना दिलासा मिळाला नाही. परंतू घरगूती वायू वापराला प्रोत्साहन देणार असल्याचे ते म्हणाले. नैसर्गिक वायुवरील मुल्यवर्धित कर १३.५ टक्क्यांवरून ३ टक्के इतका कमी केला जाणार आहे. त्यामुळे आगामी काळात सीएनजीचे दर कमी होणार आहे. हा एकप्रकारे जनतेसाठी दिलासा ठरणार आहे. सोबतच सोन्यावरील स्टॅम्प ड्युटी रद्द केल्याची माहिती त्यांनी दिली.

 

शेतकऱ्यांना अपेक्षा 'कर्जमुक्ती'ची
शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली असली तरी अद्याप प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे कर्जमाफीसाठी अर्थसंकल्पात किती निधीची तरतूद केली जाते यावर सर्वांचे लक्ष असेल. याव्यतिरिक्त रिअल इस्टेट, इन्फ्रास्ट्रक्चर यासारख्या क्षेत्राला देखील अर्थसंकल्पातून अनेक अपेक्षा आहे. छोटे व्यापारी आणि उद्योजक यांच्यासाठी देखील अर्थसंकल्पात तरतूद असेल.

Advertisement

Advertisement