Advertisement

यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निकमध्ये मेगा कॅम्पस

प्रजापत्र | Thursday, 10/03/2022
बातमी शेअर करा

 

 

येथील म. शि. प्र. मं. संचलित, यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ पॉलीटेक्निक,बीड येथे दि.09-03-2022 रोजी यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक, बीड व युवा शक्ती फौंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कॅम्पस ड्राईव्ह 2022 संपन्न. या विषयी सविस्तर वृत्त असे की, म. शि. प्र. मं संचलित यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ पॉलीटेक्निक हे ग्रामीण भागातील तसेच होतकरू विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील असते. अशा विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे ज्ञानार्जन करण्याचे कार्य, तसेच अशा विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन प्रवेशापासून ते चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देण्यासाठी विविध उपक्रमाद्वारे सतत प्रयत्नशील राहते.याचाच एक भाग म्हणून यशवंतराव चव्हाण तंत्रनिकेतन, बीड व युवा शक्ती फौंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण तंत्रनिकेतन मध्ये कॅम्पस इंटरव्यू चे आयोजन केले होते. यामध्ये महिंद्रा अँड महिंद्रा, महिंद्रा सी. आय.ई,ताज ग्रुप,मुंबई,लुमॅक्स,मिंड्डा, बजाज सन्स,ईटोन,थैसनक्रूप,मेस्सर, प्रिसिजन,रिंगगियर, इत्यादी नामांकित आंतरराष्ट्रीय कंपनी साठी मुलखाती झाल्या यामुळे सर्व शाखेतील महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या ग्रामीण भागातील मुलांना चांगल्या कंपनीमध्ये  नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे. या विद्यार्थ्यांची  ट्रेनी इंजिनिअर या पदावर निवड होणार आहे.यासाठी म.शी. प्र.म.चे अध्यक्ष माननीय आमदार श्री. प्रकाश दादा सोळंके, म.शी. प्र.म.चे सचिव माननीय आमदार श्री. सतीश भाऊ चव्हाण, महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. गायकवाड एन. एम.यांचे मार्गदर्शन लाभले.यावेळी महाविद्यालयाचे टी.पी.ओ. प्रमुख श्री. धुमाळ बी. आर. ,वाय,एस,एफ,पुणे चे झोनल मॅनेजर श्री.वासुदेव रामेकर, श्री.सुरज चाटे,श्री.मंगेश सर,श्री.विवेक सर इत्यादी व कॉम्प्युटर शाखेचे विभाग प्रमुख श्री. देशमुख जे. व्ही., मेकॅनिकल शाखेचे विभागप्रमुख श्री. शेख एफ. जे., इलेक्ट्रिकल शाखेचे विभाग प्रमुख श्री. शिनगारे एस. टी., प्रथम वर्ष विभाग प्रमुख श्री. वारंगुळे ए. व्ही., इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन शाखेचे विभाग प्रमुख नखाते एस. बी., सिव्हिल शाखेचे विभाग प्रमुख श्री. केंद्रे बी. ए., प्रा. कुलकर्णी गौरव, प्रा. तांबे नितीन,प्रा.जाधव पी. व्ही, प्रा.राऊत टी. के,प्रा.दमकोंडवर जी.के व इतर प्राध्यापक वृंद उपस्थित होते.

Advertisement

Advertisement