किल्लेधारूर-तालुक्यातील अंजनडोह येथील बालासाहेब धापसे यांची कन्या अश्विनी बालासाहेब धापसे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) स्पर्धा परिक्षेत महाराष्ट्रात (NT-C) मुलींमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. या यशामुळे तिचे पोलिस उपनिरीक्षक ( PSI ) होण्याचे स्वप्न पुर्ण होणार असून तिच्या यशाबद्दल अभिनंदन होत आहे.
( Dharur's daughter is number one in the state; Ashwini Dhapse first in the state in MPSC examination. )
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2019 पोलिस उपनिरीक्षक पदाची (PSI) सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत (NT-C) गटात मुलींतून धारुर (Dharur) तालुक्यातील अंजनडोह गावची अश्विनी बालासाहेब धापसे हिने प्रथम क्रमांक मिळवला.अश्विनी धापसे हिने दहावीपर्यंतचे शिक्षण अंजनडोह येथे तर कोल्हापूर येथे अभियांत्रिकी शिक्षण घेतले. औरंगाबाद येथे ज्येष्ठ बंधू योगिनंद बाळासाहेब धापसे यांच्या सोबत राहुन त्यांच्या प्रेरणेने स्वअध्ययन करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलिस उपनिरिक्षक पदाच्या 2019 च्या स्पर्धा परीक्षेत यश मिळवले.
अंजनडोह येथे दोन भाऊ, आई व वडील अशा जेमतेम पाच माणसांच धापसे कुटुंब आहे. काही काळ मेंढपाळ करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबात मुलगी अश्विनी हिने मोठे यश संपादन केले. कोरडवाहू शेती करून उदरनिर्वाह करत शालेय शिक्षण पुर्ण करणाऱ्या धापसे कुटूंबिय व अश्विनी धापसे हिचे अभिनंदन होत आहे.
बातमी शेअर करा