हातगाव दि.६-जानेवारी २०२२ मध्ये झालेल्या ऑल इंडिया सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यामध्ये जनता शिक्षण प्रसारक मंडळ दहीगाव ने संचलित,हातगाव येथील श्री रामेश्वरदास विद्यालयाचा इयत्ता पाचवीचा विद्यार्थी आदित्य निलेश ढाकणे याची चंद्रपूर येथील सैनिक स्कूल मध्ये सहावीत प्रवेश परीक्षासाठी निवड झाली आहे अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक अंकुश पोटभरे यांनी दिली.
आदित्य ढाकणे याने ३०० पैकी २४३ गुण मिळवून ओबीसी प्रवर्गातून राज्यात दहावा क्रमांक मिळवला आहे ,त्याला शाळेचे शिक्षक श्री बाळासाहेब कोकरे, भागवत वाघ ,मोहन उंडे,सुनील काशीद, सतीश सुपारे ,सिताराम करंजे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले आहे या यशाबद्दल आदित्य याचे संस्थेचे अध्यक्ष माजीआमदार डॉ नरेंद्र घुले पाटील, संस्थेचे सचिव माजी आमदार श्री चंद्रशेखर घुले पाटील अहमदनगर जिल्हा परिषद अध्यक्षा,नामदार सौ राजश्रीताई घुले , पंचायत समितीचे सभापती डॉ क्षितिज घुले ,प्रशासकीय अधिकारी कारभारी नजन ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री शिवाजीराव पाटील ,सरपंच अरुण मातंग ,उपसरपंच नंदा बर्गे,माजी उपसरपंच राजेंद्र पाटील माजी व्हाईस चेअरमन ज्ञानदेव अभंग संजय गलांडे तसेच शिक्षक ग्रामस्थ पालक श्री दादासाहेब ढाकणे राष्ट्रीय संपर्कप्रमुख वंजारी ओबीसी विकास महासंघ भारत यांनी अभिनंदन केले

बातमी शेअर करा