बीड : बीड जिल्ह्ज्यातील कायदा सुव्यवस्थेवर बीडमधीलच राष्ट्रवादीच्या तीन आमदारांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीवर आता सभागृहात सोमवारी चर्चा होणार आहे, विशेष म्हणजे आता विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या आमदारांनी देखील यात लक्ष घातले आहे. बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था ढासळली असल्याचा दावा करीत राष्ट्रवादीचे आ. प्रकाश सोळंके , आ. संदीप क्षीरसागर आणि आ. बाळासाहेब आजबे यांनी ही लक्षवेधी दाखल केली होती.
बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेसमोर मागच्या काही दिवसात अनेक प्रश्न लागले आहेत. पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आ. विनायक मेटे, माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी तर टीका केलीच होती, मात्र आता चक्क राष्ट्रवादीच्याच तीन आमदारांनी जिल्ह्यातील ढासळलेल्या कायदा, सुव्यवस्थेवर आक्षेप घेत लक्षवेधी सूचना विधानसभेत मंडळी आहे. यावर खरेतर शुक्रवारीच चर्चा होणार होती, मात्र शुक्रवारी सभागृह तहकूब झाल्याने आता सोमवारच्या कार्यक्रमपत्रिकेत सदर लक्षवेधीचा समावेश करण्यात आला आहे .
आता या लक्षवेधीमध्ये बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांसोबतच विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस ,चंद्रकांत पाटील , राधाकृष्ण विखे , आ. नमिता मुंदडा यांनी देखील सहभाग नोंदविला आहे.
एसपींच्या बदलीच्या चर्चा
एकीकडे विवधानसभेत सदर लक्षवेधी दाखल झालेली असतानाच मागच्या २ दिवसांपासून बीडचे पोलिसद अधीक्षक आर. राजा यांची बदली करण्यात येईल अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. बीडचे नवीन एसपी म्हणून येऊ शकतील अशा काही नावांची चर्चा देखील सध्या होत आहे