Advertisement

इंग्रजीच्या बारावीच्या पेपरात चूक

प्रजापत्र | Saturday, 05/03/2022
बातमी शेअर करा

पुणे : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. विद्यार्थ्यांना आता बोर्डाकडून गुण मिळणार आहेत. इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये त्रुटी असल्याने विद्यार्थ्यांना बोर्डाकडून मार्क मिळणार आहेत. 

 

 

बारावी बोर्ड परीक्षेला (HSC Exam) शुक्रवारपासून सुरुवात झाली. राज्यातील 9 हजार 635 परीक्षा केंद्रावर 14 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत. बारावीचा पहिला इंग्रजीचा पेपर होता. या पेपरमध्ये एका प्रश्नात त्रुटी होती. तो चुकीच्या पद्धतीनं विचारण्यात आला होता. 

 

 

बारावीची परीक्षेत इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये 1 गुणांचा प्रश्न चुकीच्या पद्धतीने विचारण्यात आला होता. त्या एका प्रश्नाचा 1 गुण विद्यार्थ्यांना मिळणार असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून सांगण्यात आलं आहे.

 

 

शुक्रवारी बारावी इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये 1 गुणांचा प्रश्न चुकीच्या पद्धतीने विचारण्यात आला होता. याबाबतच्या तक्रारी अनेक विद्यार्थ्यांनी बोर्डासमोर मांडल्या. बोर्ड अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीनंतर ज्या विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिकेत प्रश्न क्रमांक 1) A) 5 हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. 

 

 

हा प्रश्न सोडवणाऱ्या विद्यार्थ्यांना बोर्डाकडून एक गुण अधिकचा दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. इंग्रजी पेपर मध्ये बोर्डाकडून चूक झालेल्या आणि विद्यार्थ्यांने सोडवलेल्या एका प्रश्नाचा 1 मार्क विद्यार्थ्यांना मिळणार असल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. 

 

Advertisement

Advertisement