बीड-राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी काही दिवसांपूर्वी राजेश्वर चव्हाण यांची नियुक्ती झाली होती. तेंव्हापासून बजरंग सोनवणे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र बजरंग सोनवणे मौन पाळून होते. मात्र शनिवारी त्यांनी अखेर मौन सोडले असून पक्षात अनेक गोष्टीची खंत आहे, काही पराभवाचे शल्य आहे, पण धरसोड करुन काही होत नाही.मी राष्ट्रवादी सोबतच राहणार. कार्यकर्त्यांचे गैरसमज दूर करु अशी भूमिका त्यांनी जाहिर केली आहे.
सोनवणे म्हणाले, एकदाचा कार्यमुक्त झालो याचा आनंद झालाय. काम करताना सर्वांची मर्जी सांभाळत काम करण्याची कसरत करावी लागत होती. पक्षाने संधी दिली होती याबद्दल आभार असे सांगतानाच विद्यमान अध्यक्षाला दोन महिण्याचाच कार्यकाळ असल्याचे ते म्हणाले.लोकसभा निवडणुकीतील पराभवाने खचलो नाही, काम करित राहिलो. चांगल्या कामाची पावती मिळत असते.
१९९२ पासून बरेच विजय, पराजय पाहिलेत. ३१ वर्ष राजकारणात टिकूनय.पण नगरपंचायत निवडणुकीतील पराजयाचं शल्य आहे. यातून अनेक लोकं उघडे पडलेत. विधानपरिषदेला राष्ट्रवादीने आयात उमेदवार का आणला? भाजपला जागा द्यायची होती का? मागच्या जिल्हापरिषद निवडणुकीत बहुमत असतानाही सत्ता आली नव्हती, मी न्यायालयीन लढाई लढलो आणि जिल्हा परिषद राष्ट्रवादीकडे आणली. प्रत्येकवेळी मी झटून काम केले, पण पवारांच्या शब्दावर माघार घेत गेलो. मी पद कायम गौन मानले. पण तरीही काही लोक माझं पद काढण्यासाठी जातात याच शल्य आहे. पक्ष अडचणीत असताना, मोठमोठे लोक सोडतं असताना, मी संघटनेत काम केले, आणि आष्टीची जागा निवडून आणली. माझ्याकडे नेत्यांच्या मागे पुढे करण्याची सवय नाही. केवळ पवारांच्या विचारांवर काम केलं. आता कार्यकर्त्यांचा गैरसमज झालाय तो मी दूर करणार आहे.पण पक्षातील अनेकजण संधीसाधूपणा करतात, विरोधकांना निधी मिळतो याचीही खंत आहे असे बजरंग सोनवणे म्हणाले. मात्र त्याचवेळी मी धरसोड करणार नाही असेही बजरंग सोनवणे यांनी स्पष्ट केले.
आज जिल्ह्यात ऊसाचा प्रश्न गंभीर आहे, ऊसाचे गाळप होईल का नाही हा प्रश्न आहे. मी त्याचं नियोजन करतोय. आम्ही सभासदांचा ऊस शिल्लक राहू देणार नाही असेही ते म्हणाले.
प्रजापत्र | Saturday, 05/03/2022
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा