Advertisement

सोन्याच्या किंमतीने गाठला नवा उच्चांक

प्रजापत्र | Friday, 04/03/2022
बातमी शेअर करा

मुंबई : रशियाकडून युक्रेनवर हल्ला झाला. यामध्ये युरोपातील सर्वात मोठा न्यूक्लिअर पावर प्लांट (Russia Ukraine Crisis) वर हल्ला केल्यानंतर जगभरातील बाजारावर मोठा परिणाम झाला आहे. भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली. या दरम्यान सोन्याचा दर देखील रेकॉर्ड स्तरावर पोहोचलं आहे. दुसरीकडे कच्चा तेलाच्या किंमतीतही सतत वाढ होत आहे. 

 

 

आगामी काळात सोन्या-चांदीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. www.ibjarates.com नुसार, शुक्रवारी सकाळी ९९९ शुद्धतेच्या सोन्याचा भाव किरकोळ वाढून ५१६८९ रुपयांवर पोहोचला. मात्र, सकाळी चांदीच्या दरात घसरण दिसून आली. सत्राच्या सुरुवातीला सोने 51638 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले होते. तर चांदीचा भाव 68015 रुपये प्रति किलोवर बंद झाला.

 

 

१४ महिन्यातील सगळ्यात मोठा उच्चांक 
जागतिक बाजारातील वाढीमुळे शुक्रवारी देशांतर्गत बाजारात सोन्याच्या भावाने 14 महिन्यांचा उच्चांक गाठला. MCX वर, दुपारी 1 च्या सुमारास, एप्रिल डिलीवरी सोने 51954 रुपये आणि जून डिलीवरी सोने 52217 च्या पातळीवर व्यवहार करत होते. त्याचप्रमाणे मे डिलिव्हरीसह चांदी 68230 च्या पातळीवर व्यवहार करत होती.

 

 

आंतरराष्ट्रीय बाजारातील सोने-चांदीचा दर 
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 1942 डॉलर प्रति औंस या पातळीवर आहे. त्याच वेळी, चांदीची किंमत $ 25.26 च्या पातळीवर आहे. येत्या काळात सोन्या-चांदीच्या दरात आणखी वाढ होणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.

 

Advertisement

Advertisement