Advertisement

शेतात तुरीला पाणी देण्याच्या बहाण्याने नेहून ४२ वर्षीय महिलेची हत्या

प्रजापत्र | Thursday, 03/03/2022
बातमी शेअर करा

कडा : जमिनेच्या वादातून ४२ वर्षीय महिलेची हत्या करून मृतदेह जमिनीत गाडून पुरावा नष्ट करण्याची घटना आष्टी तालुक्यातील वटणवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी आष्टी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे . 

 

 

मंदा हिराभाऊ गायकवाड (वय ४५) असे मयत महिलेचे नाव आहे. मयत महिलेच्या भावाच्या फिर्यादीवरून तिघा जणांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंदा हिला भावकीतीलच भरत गायकवाड व जावई प्रल्हाद घुमरे, आणि त्याचा मित्र सुनिल गंगार्डे हे सतत महिलेला फोन करून व प्रत्यक्ष भेटून जमीन आमच्या नावावर कर असा तगादा लावत जिवे मारण्याची धमकी द्यायचे, यातुनच त्यांनी ३ नोव्हेंबर २०२१ रोजी सदरील महिलेला रात्री शेतात तुरीला पाणी देण्याच्या बहाण्याने घेऊन जाऊन तिचा खून करून मृतदेह जमिनीत पुरून टाकल्याचे बुधवारी निष्पन्न होताच मयत महिलेचा भाऊ केरू किसन चितळे याच्या फिर्यादीवरून आष्टी पोलीस ठाण्यात यातील आरोपी भरत पोपट गायकवाड (रा.वटणवाडी), प्रल्हाद नवनाथ घुमरे, सुनिल पंढरीनाथ गांगर्डे (दोघे रा. घाटापिंपरी) यांच्या विरोधात खून व मृतदेह नष्ट करण्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित तीनही आरोपीना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास आष्टी पोलीस करीत आहेत. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार, आष्टीचे उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर, पोलीस निरीक्षक सलिम चाऊस, पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांनी भेट दिली.

Advertisement

Advertisement