बीड-आमच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे खोटे असून राजकीय हेतूने दाखल करण्यात आले आहेत. आ.संदीप क्षीरसागर यांना असला सल्ला कोणी दिला असा प्रश्न आहे, मात्र पोलीस यंत्रणेने आम्हाला न्याय देण्याबाबत आश्वसत केले असल्याचे डॉ. योगेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
बीड येथील रजिस्ट्री कार्यालयातील गोळीबार प्रकरणात दाखल गुन्हयात अंतरिम जामीन मिळाल्यानंतर डॉ. योगेश क्षीरसागर यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, जयदत्त क्षीरसागर यांच्या मालकिची जागा खरेदी करण्यासाठी पवार कुटूंबातील सदस्यांमध्ये व्यवहार होणार होता. त्या रजिस्ट्रीसाठी लिहून देणार किंवा घेणार मी किंवा भारतभूषण नाहीत आणि रवींद्र क्षीरसागर किंवा इतरांचाही संबंध नव्हता. त्यामुळे तेथे कोणीच उपस्थित राहणे अपेक्षित नव्हते, त्यामुळे आम्ही तेथे नव्हतो, त्याचे पुरावे आम्ही पोलीसांना दिले आहेत. तरी सुध्दा चुकीच्या केसेस झाल्या. आमचे नाव विनाकारण गोवण्यात आले असे ते म्हणाले.
त्याचवेळी रजिस्ट्री कार्यालयात सीसीटीव्ही फुटेज का नाही? हार्ड डिस्क गायब झाली का केली ? याची जबाबदारी कोणाची? याची चौकशी व्हावी असे ते म्हणाले. फिर्यादीला आमची नावे घेण्यास कोणी भाग पाडले याचाही यंत्रणेने तपास करावा. आमच्यावर आरोप करणारांवर किती गंभीर गुन्हे आहेत हे देखील सर्वांना माहित आहे. या वादात सामान्य नागरिकांना इजा झाली असती तर त्याची जबाबदारी कोणाची असा सवालही योगेश क्षीरसागर यांनी केली.
यावेळी सचिन मुळूक, डॉ. सारिका क्षीरसागर, विलास विधाते, विनोद मुळूक, रविंद्र कदम, गणेश वाघमारे, महेश धांडे यांची उपस्थिती होती.
प्रजापत्र | Thursday, 03/03/2022
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा