बीडः येथील रजिस्ट्री कार्यालयात झालेल्या गोळीबार प्रकरणात बीडमधील माजी नगरसेवक सतीश पवार यांची पोलीस कोठडी आणखी दोन दिवसांनी (५ मार्चपर्यंत) वाढविण्यात आली आहे. सतीश पवार यांना पोलीसांनी २ मार्च रोजी अटक केली होती.
बीडच्या रजिस्ट्री कार्यालयात २५ फेब्रुवारी रोजी क्षीरसागर कुटूंबातील जमिनीच्या वादातून गोंधळ झाला होता. यात गोळीबार केल्याप्रकरणी माजी नगरसेवक सतीश पवार यांच्यावर गुन्हा दाखल आहे. तर आपल्या भावाने स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्याचा दावा सतीश पवार यांच्या बहिण प्रतिभा क्षीरसागर यांनी केला आहे.
या प्रकरणात पोलिसांनी २ मार्च रोजी सतीश पवारला अटक केली होती. न्यायालयाने त्यावेळी त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर गुरुवारी सतीश पवार यास पुन्हा न्यायालयासमोर उभे करण्यात आले. यावेळी न्यायालयाने सतीश पवार याला आणखी दोन दिवस पोलीस कोठडी दिली. तपास अधिकारी असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांनी पोलीस कोठडीची मागणी केली होती.
बातमी शेअर करा