बीड-येथील रजिस्ट्री कार्यालयातील गोळीबार प्रकरणात दाखल गुन्हयात अंतरिम जामीन मिळाल्यानंतर डॉ. योगेश क्षीरसागर आज (दि.३) भूमिका जाहीर करणार आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर एका मोठ्या आंदोलनाची तयारी त्यांच्याकडून सुरु असल्याच्या चर्चा आहेत. यामुळे योगेश क्षीरसागरांच्या आजच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मागील महिन्यात बीडच्या रजिस्ट्री कार्यालयात झालेल्या गोळीबारानंतर शहरातील राजकीय वातावरण देखील ढवळले आहे. या प्रकरणात क्षीरसागर कुटुंबातील ५ सदस्यांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल आहेत.या प्रकरणात डॉ. भारतभूषण आणि डॉ. योगेश क्षीरसागर यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांचे समर्थक आक्रमक झाले होते. तर डॉ. सारिका क्षीरसागर यांनी पदयात्रा काढून निवेदन दिले होते. त्यांनी प्रशासनाला मंगळवारचा अल्टीमेटम दिला होता.
दरम्यान या प्रकरणात मंगळवारी डॉ.भारतभूषण व डॉ. योगेश यांना अंतरिम जामीन मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर आज डॉ. योगेश क्षीरसागर दुपारी ४ वाजता आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. या भूमिकेकडे आता शहराचे लक्ष आहे
बातमी शेअर करा