Advertisement

बीडच्या खजाना विहिरीजवळ भीषण अपघात

प्रजापत्र | Wednesday, 02/03/2022
बातमी शेअर करा

बीड दि.2 : बुलेटवर जाणार्‍या तिघांना भरधाव बसने जोराची धडक दिली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी तरुणास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात धुळे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर पाली परिसरातील नक्षत्र हॉटेलसमोर बुधवारी (दि.2) रात्री 7 च्या सुमारास झाला.

 

 

पारसनाथ मनोहर रोहिटे (वय 22 रा.आहेरवडगाव ता.बीड), कृष्णा भारत शेळके (23 रा.दगडी शहाजानपूर ता.बीड), अक्षय सुरेश मुळे (22 रा.घोडकाराजुरी ता.बीड) अशी मयतांची नावे आहेत. हे तिघे बुधवारी रात्री आहेरवडगाव येथून बीडकडे बुलेटवरुन (एमएच-23 एल-7227) येत होते. यावेळी धुळे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर येताच त्यांना समोरुन आलेल्या भरधाव बसने (एमएच-14, बीटी-2455) जोराची धडक दिली. यामध्ये पारसनाथ व कृष्णाचा जागीच मृत्यू झाला. तर अक्षयला जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान अक्षयचाही मृत्यू झाला. घटनास्थळी बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे, पोह.प्रल्हाद चव्हाण, आनंद मस्के, पोशि.रवि सानप व चालक कृष्णात बडे यांनी धाव घेतली. सदरील बस पोलीस मुख्यालयात लावण्यात आली असल्याची माहिती पोलीसांनी दिली.

Advertisement

Advertisement