केज दि.२ - एका १६ वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
केज तालुक्यातील एका गावातील १६ वर्ष वयाच्या मुलीचे २६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते १०.३० वाजेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून अपहरण करण्यात आले असून तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. मात्र तिचा कुठेही ठावठिकाणा लागला नसल्याने तिच्या आईने पोलिसात धाव घेतली. सदर मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तिविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक फौजदार तुपारे हे पुढील तपास करत आहेत.
बातमी शेअर करा