बीडः बीड येथील रजिस्ट्री कार्यालयात प्रतिभा क्षीरसागर सह त्यांच्या भावांना रजिस्ट्री पासून रोखण्यासाठी प्राणघातक हल्ल्यासह दरोड्याचा गुन्हा दाखल असलेले रविंद्र क्षीरसागर यांनी अटकपूर्व जामिनासाठी बीडच्या सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या जामिनअर्जावर ५ मार्चला सुनावणी होणार आहे.
बीडच्या रजिस्ट्री कार्यालयात २५ फेब्रुवारी रोजी गोळीबार झाल्यानंतर परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले होते. यात आ. संदीप क्षीरसागर यांचे वडील रविंद्र क्षीरसागर, भाऊ हेमंत आणि अर्जून यांच्यासह आठ जणांवर प्राणघातक हल्ला आणि दरोडयाचे गुन्हे दाखल झाले होते. प्रतिभा संतोष क्षीरसागर आणि त्यांच्या भावांना रजिस्ट्री पासून रोखण्यासाठी हा हल्ला करण्यात आल्याचे फिर्यादित म्हटले होते.
गुरुवारी या प्रकरणात रविंद्र क्षीरसागर यांनी बीडच्या सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली. पाचवे जिल्हा सत्र न्यायाधिश एस टी डोके यांच्यासमोर विधिज्ञ बी डी कोल्हे यांच्यामार्फत हा अर्ज दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने या अर्जावर ५ मार्चला सुनावणी ठेवली आहे.
प्रजापत्र | Wednesday, 02/03/2022
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा