मुंबई-रशिया आणि युक्रेन यांच्यातलं युद्ध सुरू झाल्यापासून ज्या अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता होती, त्यातली एक महत्त्वाची समस्या म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती वाढण्याची शक्यता. आता तीच भीती खरी ठरताना दिसत असून अमेरिकेत कच्च्या तेलाच्या किमतींनी गेल्या ७ वर्षांतला उच्चांक गाठला आहे. अमेरिकेत कच्च्या तेलाच्या किमती आता १०६ डॉलर प्रतिबॅरल झाल्या आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींवर होण्याची दाट शक्यता आहे. भारतात आधीच निवडणुकांनंतर रोखून धरलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किमती अजून वाढण्याची शक्यता असतानाच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किंमतींमुळे त्यात अजून भर पडण्याची शक्यता आहे.
एकीकडे अमेरिकेतील कच्च्या तेलाच्या किमती १०६.७८ डॉलर प्रतिबॅरलवर पोहोचल्या असताना आंतरराष्ट्रीय बाजारात देखील कच्च्या तेलाच्या किमतींनी उसळी घेतली आहे. या किमती १०७.५७ डॉलर प्रतिबॅरल इतक्या वाढल्या आहेत. याआधी थेट जुलै २०१४मध्ये या किमती इतक्या प्रमाणात वाढल्याचं दिसून आलं होतं.
बातमी शेअर करा