अशोक शिंदे
नेकनूर-खा.संभाजी राजे यांनी मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षण आणि समाजाच्या प्रमुख मागणीवर आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे.खा.संभाजीराजेंच्या उपोषणाला राज्यभरातून मराठा समाजाचा पाठिंबा मिळत असताना आता नेकनूरमध्येही नागरिकांनी आज समर्थसाठी एक दिवसीय आमरण उपोषण सुरु केले आहे. मुंबईच्या उपोषणाचे लोण पुन्हा एकदा बीड जिल्ह्यात पाहायला मिळू लागले असून मराठा समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास याचे पडसाद आणखी तीव्र उमटतील असे चित्र आहे.
मराठा आरक्षणासाठी बीड जिल्हा कायम आक्रमक राहिला आहे.आरक्षणाची ठिणगी संपूर्ण राज्यात बीडमधूनच पडली.आता खा.संभाजी राजे यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली असून याला पाठिंबा देण्यासाठी नेकनूरमध्ये सरपंच रोहिणी परमेश्वर काळे यांच्या नेतृत्वखाली बैठक पार पडली.या बैठकीत मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्याचा ठराव एकमताने मंजूर झाल्यानंतर आज (दि.२८) सकाळपासून आरक्षण आणि समाजाच्या इतर मागण्यांसाठी नेकनूरकरांनी एक दिवसीय उपोषण सुरु केले आहे.
बातमी शेअर करा