चाकण-येथील बा. मा. पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बिरदवडी येथे शनिवारी (दि.२६) १० वी व इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ झाला.
इयत्ता दहावी चा यावर्षीचा आदर्श विद्यार्थी प्रज्वल सुरेश पडवळ हा ठरला.सर्व विद्यार्थ्यांना इयत्ता आठवी नववीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा प्रा. देवयानी पवार मॅडम तर प्रमुख पाहुणे म्हणून व्यास मंचावर संस्थेचे सचिव श्री.ईशान दादा पवार, पालक संघाचे कार्याध्यक्ष श्री.शरद मांडेकर(युवा उद्योजक), पल्लवी पडवळ,विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक श्री.चव्हाण सर उपस्थित होते सूत्रसंचालन सौ.भामरे मॅडम तर आभार श्री.दादासाहेब ढाकणे यांनी व्यक्त केले.सर्व विद्यार्थ्यांना संस्थेच्या सर्व पदाधिकारी,विद्यालयाचे प्र.मुख्याध्यापक,शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने परीक्षेसाठी व भावी जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.अशी माहिती विद्यालयाचे शालेयशिस्त,आरोग्य, क्रीडा व विज्ञान विभागप्रमुख श्री.दादासाहेब ढाकणे यांनी दिली.
बातमी शेअर करा