अशोक शिंदे
नेकनूर-बेलेश्वर संस्थानच्या महाराजांना आणि लिंबागणेशमधील एका डॉक्टरांना अज्ञात व्यक्तीने फोन करून लाखोंची खंडणी मागितल्याचा प्रकार आज दुपारी (दि.२७) समोर आला आहे.पैसे न दिल्यास या दोघांनाही जीवे मारण्याची धमकीही त्या अज्ञात व्यक्तीने दिली.नेकनूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लिंबागणेश जवळील बेलेश्वर संस्थांचे भारती महाराज व लिंबागणेश येथील डॉ .सचिन जायभाये या दोघांना एकाच नंबरवरून अज्ञात व्यक्तीने फोन करून खंडणी मागितली आहे.आधी भारती महाराज यांना फोन करून चार लाख रुपये द्या अन्यथा आम्हाला तुमच्या खुनाची सुपारी मिळाली असल्याची धमकी दिली.यानंतर थोड्याच वेळात डॉ.सचिन जायभाये यांना त्याच व्यक्तीने फोन करून ४५ लाखांची खंडणी मागितली.पैसे न दिल्यास तुमच्या हत्याची सुपारी मला मिळाली असल्याचे त्याने म्हटले आहे.याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात रविवारी (दि.२७) गुन्हा दाखल करण्यात आला असून नेकनूर पोलीस पुढील तपास करीत आहे.
बातमी शेअर करा