Advertisement

युक्रेनची राजधानी पडली

प्रजापत्र | Friday, 25/02/2022
बातमी शेअर करा

युक्रेन आणि रशियातीलयुद्ध दुसऱ्या दिवशी शमण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. युक्रेनच्या सैन्याला रशियाने शरणागती पत्करण्यास सांगितले, तेव्हा युक्रेनने रशियाला चर्चेचा प्रस्ताव पाठविला आहे. यावेळी युक्रेन सैनिकांनी प्रतिकार थांबविला तर रशिया चर्चा करेल अशी अट रशियाने घातली होती. अखेर आता रशिया आपले प्रतिनिधी युक्रेनमध्ये पाठविण्यास  तयार झाला आहे. 

 

 

या साऱ्या घडामोडींना आता उशिर झाला असून रशियाच्या सैन्याने कीवच्या रस्त्यावर ताबा मिळविला आहे. रशियाच्या चिलखती गाड्या कीवच्या रस्त्यांवर दिसू लागल्य़ा आहेत. यामुळे कीव हरल्यात जमा आहे. आता पुढील दिशा चर्चेअंती स्पष्ट होणार आहे. अमेरिका आणि नाटोने साथ सोडल्याने युक्रेनवर ही परिस्थीती ओढवल्याचा आरोप युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी केला आहे. यामुळे अमेरिकेची धोका देण्याची मानसिकता पुन्हा एकदा जगासमोर आली आहे. 

 

 

रशियाने युक्रेनवर हल्ला करण्याच्या आधी NATO देशांनी युक्रेनला मदत करण्याचे आश्वासन दिले होते. पण, ऐनवेळी या देशांनी आपला शब्द पाळला नाही. यामुळे बलाढ्य अशा रशियासमोर युक्रेन युद्धात एकटा पडला. रशियाने युक्रनेच्या प्रमुख सैन्य स्थळांवर हल्ले केले, अनेक शहरांचा ताबा मिळवला. अणु उर्जा प्रकल्पही ताब्यात घेतला. या सर्व घडामोडीनंतर आता युक्रेनकडे तीन पर्याय उरले होते. रशियन सैन्य युक्रेनच्या राष्ट्रपती भवनात कधीही घुसू शकते. युक्रेनने शरणागती पत्करावी असे अनेक संरक्षण तज्ञ म्हणत आहेत. युक्रेनने शरणागती पत्करली तर तेथील लाखो लोकांचे प्राण वाचतील. 

 

Advertisement

Advertisement