बीड: बीड जिल्ह्यातील चार नगरपंचायतीच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून पुढिल वर्षी या निवडणूका होणार आहेत. त्यासाठीची आरक्षण सोडत १० नोव्हेंबर रोजी होणार आहे. आष्टी, पाटोदा, शिरुर आणि वडवणी नगर पंचायतींसाठी आरक्षण सोडत होणार आहे, तर केज नगर पंचायत बाबत अद्याप निर्णय झालेला नाही. या नगर पंचायतीवर सध्या प्रशासक आहे.
बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, शिरुर आणि वडवणी नगर पंचायतीची मुदत या वर्षाच्या नोव्हेंबरमध्ये संपत आहे. मात्र कोरोना परिस्थितीमुळे या नगर पंचायतींच्या निवडणूकांना काहिसा उशीर होणार आहे. आता राज्य निवडणूक आयोगाने या नगर पंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात केली आहे. या नगर पंचायतीमध्ये प्रभाग रचना आणि आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आयोगाने जाहिर केला आहे. या नगर पंचायतीमध्ये आरक्षण सोडत १० नोव्हेंबर रोजी होणार आहे. तर प्रभाग रचनेवर अंतिम मोहोर २४ डिसेंबरला उमटणार आहे. त्यामुळे या नगर पंचायतीमध्ये पुढील वर्षी निवडणूका होणार असल्याचे स्पष्ट आहे.
प्रजापत्र | Tuesday, 13/10/2020
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा