चाकण-बा.मा. पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बिरदवडी (ता.खेड) येथे गुरुवारी (दि.२४) सन २०२१-२२ मधील प्रथम पालक- शिक्षक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य यशवंतराव पवार यांना श्रद्धांजली समर्पित करण्यात आली. यावेळी नवीन पालक संघ कार्यकारिणीची स्थापना करण्यात आली.
यामध्ये अध्यक्षपदी प्रभारी मुख्याध्यापक विजय चव्हाण, कार्याध्यक्ष शरद मांडेकर, उपाध्यक्ष मुस्तफा शेख, सचिव जयश्री भामरे, सहसचिव पल्लवी पडवळ, खजिनदार उज्वला काळ डोके, सदस्य राजु केदारी,विठ्ठल चव्हाण, विजय आळनकर, दत्तात्रय मांडेकर,अनिल चौगुले,दादासाहेब ढाकणे यांची नियुक्ती करण्यात आली.सर्व नवनियुक्त पालक संघ कार्यकारिणीचे ज्योतिबा एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा प्रा.देवयानी पवार व सचिव ईशान (दादा) पवार यांनी अभिनंदन केल्याची माहिती विद्यालयाच्या शालेय क्रीडा,आरोग्य विभाग व विज्ञान विभाग प्रमुख दादासाहेब ढाकणे यांनी दिली.