Advertisement

अहमदनगरचे 40 विद्यार्थी यूक्रेनमध्ये अडकले

प्रजापत्र | Thursday, 24/02/2022
बातमी शेअर करा

अहमदनगर : जगावर पुन्हा एकदा तिसऱ्या महायुद्धाचे (World War) ढग दाटून आले आहेत. रशिया (Russia) आणि यूक्रेनमधील (Ukraine) संघर्ष तीव्र झालाय. रशियाने यूक्रेनच्या किव शहरापर्यंत आपलं सैन्य घुसवलं आहे. तसंच रशियाकडून यूक्रेनवर मिसाईल हल्ले केले जात आहेत. अशावेळी भारतातील अनेक कुटुंबांना आपल्या मुलांची चिंता लागून राहिली आहे. कारण भारतातील अनेक विद्यार्थी यूक्रेनमध्ये शिक्षणासाठी आहेत. एकट्या अहमदनगरचेच (Ahemadnagar) जवळपास 40 विद्यार्थी यूक्रेनमध्ये शिक्षण घेत आहेत. हे विद्यार्थी तिथे अडकून पडले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. डॉक्टर व्हिडिओकॉन एज्युकेशनल कन्सल्टन्सी संस्थेचे डॉक्टर महेंद्र झावरे पाटील यांच्या मार्फत 40 विध्यार्थी यूक्रेनमध्ये शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांच्या पालकांनी भारत सरकारला मुलांना सुखरुप परत आणण्याचं आवाहन केलंय. यावेळी पालकांच्या चेहऱ्यावरील चिंतेचं सावट स्पष्ट दिसून येत आहे.

 

 

 

Advertisement

Advertisement