परळी वैजनाथ (प्रतीनिधी)÷तालुक्यातील दादाहरी वडगाव येथील वेस जवळ एका उभ्या असलेल्या ट्रक मधून 15 सोयाबीनचे पोते अज्ञात 3 ते 4 चोरट्यांनी पिकप मध्ये भरून लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सदरील ट्रक ड्रायव्हरच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास प्रभारी सपोनि भुतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सुंदर केंद्रे हे करीत आहेत. गेल्या काही दिवसापासून परळी ग्रामीण हद्दीत सोयाबीन चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत.
याबाबत परळी ग्रामीण पोलीस ठाण्याकडून प्राप्त माहिती अशी की दिनांक 19 फेब्रुवारी 2022 रोजी रात्री दोनच्या सुमारास दादाहरी वडगाव वीस जवळ ट्रक क एम.एच 04 एफ.जे 4339 यामध्ये खामगाव येथिल व्यापारी प्रमोद चांडक यांच्या मालकीचे 281 पोते सायाबीनचे घेउन परळी येथे येत असताना दादाहरी वडगाव वेस जवळ रोडवर गाडी खराब झाली. त्याच ठिकानी दि.19 फेब्रुवारी 2022 रोजीच्या रात्री 2.30 वाजण्याच्या सुमारास 3 ते 4 आज्ञात चोरटयाने ट्रक मधील पाठिमागील दोरी कापून 15 पोते वजनी 12 क्व्टिल 40 कीलो अंदाजे 90,000 रुपयेयाचे सोयाबीन पिकप मधे टाकुन चोरून नेले आहे. याप्रकरणी दिनांक 23 फेब्रुवारी 2022 रोजी ट्रक चालक दादाराव काशीराम वानखेडे राहणार खामगाव जिल्हा बुलढाणा यांच्या फिर्यादीवरून गुरन 45/2022 कलम 379 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद भुतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सुंदर केंद्रे हे करीत आहेत.