Advertisement

नवाब मलिकांना कोर्टाचा दणका

प्रजापत्र | Wednesday, 23/02/2022
बातमी शेअर करा

मुंबई - राज्य सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी कार्यालयात नेले होते. तिथे सकाळपासून त्यांची चौकशी सुरू होती. भल्या पहाटे ईडीने नवाब मलिक यांच्यावर कारवाई केल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून ही कारवाई सुडबुद्धीने करण्यात आल्याचा आरोप राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. मात्र अंमलबजावणी संचलनालयाने नवाब मलिक यांना आठ तासांच्या चौकशीनंतर अटक केली आहे. सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात नवाब मलिक यांना हजर केले. ईडीने १४ दिवसांची नवाबांची कोठडी पाहिजे म्हणून युक्तिवाद केला. मात्र, न्यायालयाने नवाब मालिकांना आठ दिवसांची ईडीची कोठडी सुनावली आहे. आता नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत राहावे लागणार आहे. 

 

Advertisement

Advertisement