बीड दि.२३ (प्रतिनिधी)-एसटी कर्मचाऱ्यांच्या संपला १०० दिवस नुकतेच झाले असून बुधवारी (दि.२३) पहिल्यांदाच बीड जिल्ह्यातून ३५२ बस फेऱ्यांमधून १८ हजार २३८ प्रवाशांनी सेवेचा लाभ घेतला असल्याची माहिती विभाग नियंत्रक अजय मोरे यांनी दिली.
बीड जिल्ह्यातून मागच्या काही दिवसांपासून बस फेऱ्यांची संख्या टप्याटप्याने वाढू लागली असून संपाच्या १०० दिवसानंतर पहिल्यांदाच ३५२ फेऱ्या जिल्ह्यातून झाल्या.यावेळी १८ हजार २३८ प्रवाशांनी सेवेचा लाभ घेतला असून अंबाजोगाई आगारातून सर्वाधिक ७० फेऱ्या झाल्या.त्यापाठोपाठ बीड आगारातून ६२,परळी आगारातून ६२,धारूर आगारातून ५२,गेवराई आगारातून ३०,पाटोदा आगारातून १८,आष्टी आगारातून ४८ तर माजलगाव आगारातून १० बस धावल्या. दरम्यान वाढत्या बस फेऱ्यांमुळे प्रवाशांची गैरसोय दूर होऊ लागली आहे.
बातमी शेअर करा