नवी दिल्ली-नवनीत राणा यांची खासदारकी जाणार की राहणार? याबाबत आज (दि.२३) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. नवनीत राणांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे खासदारकीचा अंतिम निर्णय आज होणार आहे.
खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा ठपका ठेवत माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी या जात प्रमाणपत्र विरोधात न्यायालयात धाव घेतली होती. नवनीत राणा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर स्थगिती देण्यात आली होती. बोगस जात प्रमाणपत्रावर अंतिम निर्णय येईपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने स्थगन आदेश दिला होता. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील जात वैधता संदर्भातील अंतिम सुनावणी आज होत आहे. त्यामुळे काय निर्णय लागतो याकडे लक्ष लागले आहे.मुंबई उच्च न्यायालयाने अमरावती लोकसभा सदस्य नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द केले होते. कारण बनावट कागदपत्रे वापरून फसवणूक केली गेली आणि त्यांना सहा आठवड्यांत आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले होते. तसेच न्यायालयाने खासदाराला दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावला होता. याविरोधात नवनीत राणा सर्वोच्च न्यायालयात गेल्या होत्या.
बातमी शेअर करा