दिल्ली : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी हाथरस येथील पीडित कुटुंबाची भेट घेतली. यावेळी हाथरस प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होणं आवश्यक आहे. सीबीआय तपासातून काहीही साध्य होणार नाही, असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
पीडित कुटुंबाची भेट घेतल्यानंतर प्रकाश आंबेडकर म्हणाले, "संबंधित कुटुंब अस्वस्थ आहे. या कुटुंबाचं दुःख वाटून घेण्यासाठी आलो आहे. या कुटुंबाचा पोलीस प्रशासनावर विश्वास राहिलेला नाही. न्यायालयीन तपासाचे आदेश आल्यास त्याला क्रिमिनल प्रोसिजर कोड लावायला हवा. यामुळे पुरावे काढणं सोपं होईल."
सीबीआय तपासासंदर्भात बोलताना ते म्हणाले, "येथील अधिकारीच सीबीआयमध्ये जातात. स्थानिक अधिकाऱ्यांशीही त्यांचे संबंध असतात. अशात सीबीआयवर विश्वास नाही. जर सीबीआय अथवा एसआयटीने तपास केला, तर सर्व दस्तऐवज न्यायालयाच्या देखरेखीत असायला हवेत. तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली होऊ नये."दरम्यान हाथरस येथील कथित सामूहिक बलात्कार प्रकरणाची चौकशी सीबीआयनं सुरू केली असून याप्रकरणी एफआयआर दाखल केली आहे.
प्रजापत्र | Monday, 12/10/2020
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा