बीड दि.22 फेब्रुवारी – मानलेल्या आईच्या सांगण्यावरुन नवऱ्याने बायकोला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार अंबाजोगाई ( Ambajogai ) येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी पिडितेच्या पतीसह राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षावर ( Beed NCP) कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
( NCP woman district president charged; See what’s the type … )
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईमध्ये कौटुंबिक हिंसाचाराची घटना घडल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी संगीता तुपसागर (Sangeeta Tupsagar) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुपसागर या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बीडमधील महिला जिल्हाध्यक्षा आहेत.
तुपसागर यांच्यासह पीडितेचा पती भुजंग भुतावळे याच्या विरुद्ध पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या दोघांविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराचा ( Domestic violence ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षांचा समावेश असल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.
काय आहे प्रकरण?
मानलेल्या आईच्या सांगण्यावरून पतीने विवाहितेला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. बीडमधील (Beed) अंबाजोगाईत या प्रकार घडला आहे. या प्रकरणी राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा ( Nationalist Congress Party Women District President ) संगीता तुपसागर यांच्यासह पीडितेचा पती भुजंग भुतावळे या दोघांविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
संगीता तपसागर ह्या पीडितेची मानलेली सासू आहे. आरोपींमध्ये राष्ट्रवादीच्या ( NCP ) महिला जिल्हाध्यक्षांचा समावेश असल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास अंबाजोगाई शहर पोलीस (Police) करत आहेत.
दरम्यान , पक्षांतर्गत कुरघोडी व राजकीय सुडबुध्दीतून माझ्यावर आरोप करुन खोटी तक्रार करण्यात आली असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा संगिता तुपसागर यांनी माध्यमांना दिली आहे.