हिसार-फरलो अर्जावर तुरुंगाबाहेर असलेला डेराप्रमुख गुरमीत राम रहीम सिंग याला आता झेड प्लस सुरक्षेत ठेवण्यात येणार आहे. या संदर्भात एडीजी सीआयडीच्या वतीने रोहतक रेंज कमिशनरना पत्र लिहिले आहे. राम रहीमला खलिस्तानसमर्थित दहशतवाद्यांकडून धोका असल्याची माहिती गृह मंत्रालयाकडून मिळाली असून शिक्षा होण्यापूर्वीच त्याला धमक्या येत होत्या, असे या पत्रात सांगण्यात आले आहे. हा धोका लक्षात घेता गुरमीत राम रहीमची सुरक्षा कडक करणे आवश्यक होते.
डेराप्रमुख गुरमीत राम रहीम ७ फेब्रुवारीपासून फरलो सुटीवर आहे आणि या काळात तो गुरुग्राममध्ये आपल्या डेऱ्यात कुटुंबासह राहत आहे. 23 फेब्रुवारी रोजी गुरमीतला फरलो देण्याच्या विरोधात हायकोर्टात सुनावणी होणार आहे.
	        
	         बातमी शेअर करा  
	      	    
	    
  
	    
  
	
      
                                    
                                
                                
                              
