नांदेडमध्ये विवाह सोहळा उरकून नववधूला घेऊन जात असताना टाटा मॅजिक आणि टेम्पोचा समोरासमोर भीषण अपघात झाला. यात टाटा मॅजिक गाडीमधील ४ जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (२१ फेब्रुवारी) सायं. ६ वाजताच्या सुमारास भोकर-हिमायतनगर या राष्ट्रीय महामार्गावर घडली. अपघाताची भीषणता पाहता मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी भोकर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस पोहोचले आहेत.
	        
	         बातमी शेअर करा  
	      	    
	    
  
	    
  
	
      
                                    
                                
                                
                              
