मुंबई-राहुल तेवातिया आणि रियान पराग यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर राज्यस्थान रॉयल्सनं रोमांचक सामन्यात हैदराबाद संघाचा पाच गड्यांनी पराभव केला. तेवातिया आणि रियान पराग यांनी केलेल्या नाबाद ८५ धावांच्या भागिदारीच्या बळावर राजस्थान संघानं विजय मिळवला. तेवातियानं २८ चेंडूत ४५ धावांची पुन्हा एकदा झंझावाती खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. तेवातियाला युवा रियान परागने साथ दिली. रियान परागने २६ चेंडूत ४२ धावांची खेळी केली. तेवातिया-रियान या जोडीनं राजस्थानला अशक्यप्राय विजय मिळवून दिला.
हैदराबादच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात १५८ धावांपर्यंत मजल मारली. मनिष पांडेचे अर्धशतक (५४) आणि वॉर्नरची ४८ धावांची खेळी याच्या बळावर हैदराबादने सन्माजनक धावसंख्या उभारली. राजस्थानकडून जोफ्रा आर्चर, कार्तिक त्यागी आणि जयदेव उनाडकट या तिघांनी शिस्तबद्ध गोलंदाजी करत १-१ बळी टिपला. या त्रिकुटाला श्रेयस गोपाल आणि बेन स्टोक्स यांनी गोलंदाजीत चांगली साथ दिली.
हैदराबाजनं दिलेलं १५९ धावांचं आवाहन पार करताना राजस्थानची सुरुवात खराब झाली. पहिलाच सामना खेळणारा बेन स्टोक्स स्वस्तात माघारी परताला. त्यानंतर बटलर आणि कर्णधार स्मिथही स्वस्तात बाद झाले. राजस्थानचा संघ अडचणीत असताना उथाप्पा आणि सॅमसन यांनी सावध खेळी केली. मात्र, राशिद खानच्या गोलंदाजीवर सॅमसन आणि उथप्पा बाद झाले. राजस्थानने १२ षटकांत पाच गड्यांच्या मोबादल्यात फक्त ७८ धावा केल्या होत्या. त्यानंतर तेवातिया आणि रियान पराग जोडीनं सुरुवातीला सावध फलंदाजी केली. अखेरच्या काही षटकांत दोघांनीही दमदार फलंदाजी करत संघाला अशक्यप्राय विजय मिळवून दिला. हैदराबादकडून खलील अहमद आणि राशीद खान यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
बातमी शेअर करा