बीड-छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने अनोखा उपक्रम राबवित बीड शहरातील दोन मुलींनी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कळसुबाई शिखर तीन तासात सर करीत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.
रिद्धी राजपूत व मानसी राजपूत अशी त्या दोन मुलींची नावे आहेत. या मुली बीड येथील राजस्थानी विद्यालयात शिक्षण घेत आहेत. यातील रिद्धी दूसरी तर मानसी सहावीच्या वर्गात शिकत आहेत. शिवजयंतीनिमित्त या दोन्ही मुलींनी वेगळा उपक्रम राबविण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार त्यांनी राज्यातील सर्वांत उंच म्हणून ख्याती असलेल्या कळसुबाई शिखर केवळ तीन तासात सर केले. याबद्दल त्यांचे कुटुंबिय,मित्र मैत्रिणींनी स्वागत केले आहे.
बातमी शेअर करा